हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते गुलाबराव पाटील साहेब सूचनेवरून दि. २९ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र शिवसंवाद दौरानिमित्त विधानसभा निहाय पदाधिकरी लोकप्रतीनिधी संवाद आढावा बैठकीत युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब,शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी,शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगांव लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, महिला संपर्कप्रमुख सरिताताई कोल्हे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शिवसेना वैद्यकीय कक्ष जितेंद्र गवळी, शिवसेना मा.नगरसेवक मनोज चौधरी तथा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मचा शुभारंभ डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या सर्वांचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री दिवसरात्र काम करत आहेत, आपले जनतेप्रती असणारे कर्तव्य पार पडत आहेत. यामुळे आपण देखील सर्वांनी त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान द्यायला हवं. या प्रसंगी डॉ श्रीकांत शिंदे साहेबांनी युवासैनिक रोहित कोगटा यांचे या कार्यासाठी कौतुक करीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक सदस्य नोंदणी जळगांव जिल्ह्यात राबविण्यात यायला हवे असे कार्यसम्राट डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन सूचना केल्या. दरम्यान या बैठकीसाठी जिल्हप्रमुख यांच्यासह शिवसेना, महिलाआघाडी, युवासेना, पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, विधानसभा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख,सर्कलप्रमुख व शिवसैनिक यांची उपस्थिती होती.