कंडारी येथे २०० होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न

२०० होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मा ना गुलाबराव पाटील साहेब (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ) , भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व श्री चॅरिटेबल संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न…..

कंडारी -: मा.ना. गुलाबराव पाटील साहेब (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा),भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व श्री चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष शाम कोगटा यांच्या तर्फे २०० होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य (६ वह्या, २ पेन, २ पेन्सिल, खोडरबर,शार्पनर ) वितरण करण्यात आले.
वह्या व लेखन साहित्य वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष -युवासेना श्री.रोहित कोगटा, उत्तर महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. जितु गवळी, कंडारी गावाचे सरपंच मा.यशोदाबाई सोनवणे, पोलिस पाटील मा. श्री. कैलास सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य आणि रविंद्र परदेशी (छोटू भाऊ), सचिन परदेशी, विजय सुर्वे, दुर्वास पवार, लखन परदेशी, प्रदीप परदेशी, प्रमोद परदेशी, रंजीत परदेशी,छगन परदेशी ,माधव परदेशी (टेलर), बिसन परदेशी, भूषण परदेशी, गोपाल परदेशी,मल्हारराव देशमुख, जयवंतराव सुर्वे, छोटू नाईक, उमेशभाऊ सोनवणे,संदीप धनगर, मिठाराम धनगर, प्रवीण धनगर,दीपक धनगर, अजय मोरे, सीताराम चिंचोले , आकाश बाविस्कर, उमेश चिंचोले, हिरामण चिंचोले, शत्रुघ्न वाणी, दत्तू भाऊ कोळी, विशाल चव्हाण, प्रभाकर पाटील (पप्पूभाऊ) वितरण सोहळ्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते