युवासेनेत नवचैतन्य! जळगावात शेकडो नविन सदस्यांची नोंदणी

जळगाव, दि. ३० मे २०२५ – आज सकाळी ११ वाजे पासुन IMR कॉलेज चौक, जळगाव येथे युवासेना, शिवसेना जळगाव शहर तर्फे भव्य सदस्य नोंदणी अभियान उत्साही वातावरणात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले.

हा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.

युवा नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब ,युवासेना कार्याध्यक्ष मा.पूर्वेशजी सरनाईक,मुख्य सचिव राहुलजी लोंढे, सचिव किरणजी साळी, उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कारजी भुसे, जिल्हा परिषद सदस्य व युवानेते प्रतापरावजी पाटील यांच्या प्रेरणेतून, उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेशजी पाटील, युवासेना कार्यकारिणी सदस्य निखिलजी चौधरी व युवासेना विस्तारक किशोरजी भोसले यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे आयोजन करण्यात आले.

सदस्य नोंदणी कार्यक्रमात शहरातील युवक, विद्यार्थी, व युवासेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक नवोदित युवकांनी युवासेनेची सदस्यता स्वीकारत सामाजिक कार्यात सक्रिय होण्याची तयारी दर्शविली.

युवासेना जळगाव शहराच्या वतीने सर्व सहभागी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, भविष्यातही असेच युवकांना जोडणारे उपक्रम राबविले जाणार असल्याचे युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा यांनी सांगितले.

या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी विस्तारक सरिता ताई माळी,युवासेना विस्तारक किशोर भाऊ भोसले,शिवसेना महानगर प्रमुख संतोष भाऊ पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित भाऊ कोगटा,
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र भाऊ गवळी,
युवासेना महानगर उपाध्यक्ष सनी सोनार,
युवासेना महानगर उपाध्यक्ष विशाल निकम
उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी नयन चव्हाण,रोहन सपकाळे,शुभम कस्तुरे,प्रथमेश पाटील,जय कस्तुरे,कल्पेश बागूल,धीरज सोनार, सुशील मोरे,दीपक सोनवणे, पीयूष सोनार, यश पाटील, संदीप पाटील, रोहित गवळी, दिनेश पाटील इ शिवसैनिकांनी परिश्रम घेतले