शिरसोली येथे आर.ओ. थंडगार पाणपोईचे उद्घाटन मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

आज दि 01/05/2025 रोजी 11 वाजता शिरसोली प्र न बस स्टँड जवळ मा.ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने तथा शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख (सेवार्थी) शाम कोगटा यांच्या मार्गदर्शनाखाली पाणपोई चे उदघाटन मा ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ,ही पाणपोई मुख्य रस्त्यावर असल्यामुळे अनेक गरजु लोकांना त्यांची तहान भागवता येईल,या पाणपोई चे वैशिष्ट्य लोकांना पिण्यासाठी R.O.चे थंडगार पाणी उपलब्ध असणार आहे, या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री शाम कोगटा, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा,मा पस सभापती नंदू आबा पाटील माजी सरपंच अनिल पाटील तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी ,शिवसैनिक, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बबन धनगर,निलेश बारी,अविनाश पाटील,नीरज वाणी ,अनिल न्हावी,विशाल निकम,किरण काटोले,विजय यादव,विवेक बारी,यांनी परिश्रम घेतले ,या पाणपोई चा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाणपोई चे सेवेकरी शाम कोगटा यांनी केले.