जि. प. मराठी मुलांची शाळा. कंडारी येथील २०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मा .ना गुलाबरावजी पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव विधानसभा क्षेत्रप्रमुख शामभाऊ कोगटा,शिवसेना नगरसेवक मनोज चौधरी व युवासेना जिल्हाध्यक्ष मा. रोहितभाऊ कोगटा यांच्या कडून वह्या, पेन, पेन्सिल आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक मा. तुषार लोहार सर , उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष मा.जितेंद्र गवळी, आर. एस. एस. जळगांव तालुका विधानसभा ग्रामीण क्षेत्रप्रमुख मा. रवींद्र परदेशी, श्री. सुपडू मालचे, श्री मिठाराम धनगर, श्री सुधाकर सोनवणे, श्री सचिन परदेशी, उपमहानगर प्रमुख पवन ठाकूर हे सर्व मान्यवर उपस्थित होते.