युवा शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत,श्री पूर्वेश सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष यांच्या आदेशाने,युवासेना जळगांव तर्फे आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जळगांव येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले.
आज दिनांक 05/08/2025 मंगळवार रोजी ठीक दुपारी 12 वाजता शिव सेना मध्यवर्ती कार्यालय जळगाव पांडे चौक येथे युवा सेना जिल्हाध्यक्ष श्री रोहितभाऊ कोगटा यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी यांच्या बहुसंख्य उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्याच्या अपमानास्पद वापरलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्याकरिता मोठ्या संख्येने शिवसेना कार्यालयात पदाधिकारी यांनी उपस्थिती देऊन निषेध नोंदवताना भगवा हा संपूर्ण हिंदू समाजाचे दैव प्रतीक असल्याने आम्ही हे खपवून घेणार नाहीत भगव्याचा अपमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, वारकरी संप्रदाय चा अपमान तसेच संपूर्ण हिंदू संस्कृती चा अपमान असल्यामुळे हा निषेध नोंदवला जात असल्याने काँग्रेस चे माजी मंत्री पृथ्वीराज यांनी अवमानस्पद वापरलेले वक्तव्य बाबत सर्व भगव्याचे प्रेमी असणाऱ्या सखल हिंदू समाज तसेच भगव्याची आण बान शान वगळनाऱ्या सर्व भारतीय बांधव यांची केलेल्या अवमानस्पद वाक्याबाबत माफी मागून वक्तव्य मागे घ्यावे याकरिता शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो असे नारे लावून घोषणाबाजी करीत शिस्तीने निषेध नांदवताना किशोरभाऊ भोसले ( उत्तर महाराष्ट्र निरीक्षक) रोहितभाऊ कोगटा (युवासेना जिल्हाध्यक्ष जळगाव) जितेंद्र भाऊ गवळी (उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वैद्यकीय कक्ष)अजय महाजन (तालुका प्रमुख जळगाव)दिपक 4भदाणे(तालुका प्रमुख धरणगाव) निरज वाणी (जिल्हा सरचिटणीस) अविनाश पाटील (तालुका संघटक जळगाव) दिपक पाटील (वैद्यकीय मदत कक्ष) भूषण पाटील (उप तालुका प्रमुख) आकाश पाटील (तालुका समन्वयक) प्रशांत पाटील,सोनू तायडे ,विक्रम परदेशी, विनोद पवार , संतोष ताडे , शेषराव लष्करे, भरत कुऱ्हाडे, किरण काटोले, नाना बारी आदी बहुसंख्य युवासेना पदाधिकारी उपस्थित होते