युवासेना जळगाव जिल्हा अध्यक्ष नियुक्ती

दि. २३/०९/२०२४: शिवसेना पक्षाच्या “युवासेना जळगाव, जिल्हा अध्यक्ष (जळगाव शहर जळगाव ग्रामीण, अमळनेर)” पदी श्री. रोहित साधना राधेशाम कोगटा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

तसे नियुक्ती पत्र युवा सेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश प्रताप सराईक यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
मा.ना गुलाबरावजी पाटील, जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, प्रतापराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, महानगर प्रमुख कुंदन काळे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय कक्षप्रमुख जितेंद्र गवळी, तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.