महाविजय संवाद – सोशल मीडिया सैनिक बैठकांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र दौरा सोशल मीडिया चे प्रमुख राहुल भाई कनाल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथे सभा घेण्यात आली. ह्यावेळी पक्षाचा प्रसार व प्रचार ह्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना ऑनलाईन सदस्य नोंदणी चे अनावरण करण्यात आले,तसेच या कार्यक्रमाला शिवसेना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री राहुल कनाल, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रतापराव पाटील, युवासेना सचिव रुपेश पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जळगाव सरिताताई माळी कोल्हे, विस्तारक महाराष्ट्र राज्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रथमेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख जळगाव श्री रोहीत कोगटा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी, मयूर मगर, निखिल चौधरी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.