मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नुकताच देशी गायीला राज्यमाता-गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला. याचे औचित्य साधत युवासेनेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. जळगाव येथे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात युवासेनेच्या वतीने “राज्यमाता-गोमाता” दर्जा बाबत #महायुती सरकारणे घेतलेल्या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी युवासेनेच्या वतीने जळगाव शहरातील पांझरापोळ गोशाळेत जाऊन गायींचे औक्षण करत, गोसेवा करून आनंद व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री साहेबांचे आभार देखील मानले.
यासमयी युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, महानगर प्रमुख हर्षल मावळे, उप-महानगर प्रमुख पवन ठाकूर, शिवसेना जळगाव महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदण काळे, शिवसेना मागासवर्गीय सेल महानगर प्रमुख चेतन सनकत, शिवसेनेचे राहुल नेतलेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावेश ढाके, जळगाव ग्रामिण विधानसभा कक्ष प्रमुख विशाल निकम, जळगाव महानगर प्रमुख दिपक पाटील, केमिस्ट सेल प्रमुख धिरज ठाकूर, चेतन तांबोली, प्रदिप पारधी, यांसह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
